
Pandharpur Ashadhi Wari: पंढरपूर आषाढी वारीला १९ जूनपासून सुरुवात होणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं रवाना होतील. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफीची घोषणा सरकारने केलीय. १८ जून ते १० जुलै या काळात पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या पालखी मार्गावर टोलमाफी असणार आहे.