
Pandharpur Wari 2025 Schedule: महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा असणाऱ्या आषाढी वारीची तयारी आता सुरू झालीय. आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाची तारीख ठरलीय.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे प्रस्थान कधी होणार याची तारीख समोर आली असली अद्याप वेळापत्रक समोर आलं नाहीय. सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कधी येणार याची तारीखही ठरली आहे.