Ashadhi Ekadashi: 'शरद पवार नास्तिक तरी...'; 'त्या' किश्श्यामुळे झाली सर्वांची बोलती बंद| ashadi ekadashi sharad pawars atheist | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadhi Ekadashi: 'शरद पवार नास्तिक तरी...'; 'त्या' किश्श्यामुळे झाली सर्वांची बोलती बंद

Ashadhi Ekadashi: 'शरद पवार नास्तिक तरी...'; 'त्या' किश्श्यामुळे झाली सर्वांची बोलती बंद

आषाढी एकादशी म्हणजे मोठी एकादशी. महाराष्ट्रात लाखो भाविक कित्येक दिवस पायी चालत त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात. दरम्यान, राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.(ashadi ekadashi sharad pawars atheist maharashtra politics)

हेही वाचा: PHOTOS: पणजोबा ते पणतू; शिंदे घराण्यातल्या चार पिढ्या विठोबा चरणी!

खरं तर शरद पवार मूळचे समाजवादी असल्याने ते नास्तिक आहेत असे समजलं जाते. आणि त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार हे नेहमी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला पंढरपूरला जात असत, पण ते पांडुरंगाचे दर्शन घ्यायला कधीच मंदिरात जात नसत. त्यामुळे लोकांना वाटतं होते की पवार नास्तिकच आहेत.

पण एकदा शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी फारच आग्रह केल्यावर केवळ पत्नीच्या आग्रहासाठी शरद पवार विठ्ठल मंदिरात आले. तेव्हा प्रतिभा ताई या मनोभावे पूजा करत होत्या. आणि शरद पवार साहेब मस्त बाहेरच्या हत्ती दरवाजातील कट्टय़ावर बसून कार्यकर्त्यांशी गप्पा मारत होते.

तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी खवचटपणे पवारांना विचारले की, तुम्ही देव मानीत नाहीत, तर मग पांडुरंगाच्या पूजेला कसे काय आलात?

हेही वाचा: तुकोबारायांची सुद्धा वारी चुकली होती, तेव्हा त्यांनी काय केलं?

राजकारणात मुरलेल्या पवारांनी लगेच, हजरजबाबी उत्तर दिले, "माझ्या महाराष्ट्राची कोटय़वधी जनता पांडुरंगास देव मानते, त्यांच्या धार्मिक भावनेचा आदर करण्यासाठी आज मी इथे आलो आहे." त्याचे हे उत्तर ऐकून आजुबाजुला बसले सगळेच शांत बसले.

तसेच, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार नास्तिक आहेत, ते देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही, या शब्दांत शरद पवारांवर टिका केली होती. यावर उत्तर देताना त्यांनी एक किस्सा सांगितला.

हेही वाचा: Photo: 'या' कलाकारांनी घेतला यंदा वारीचा आनंद, गजर करत धरला ठेका..

त्या म्हणाल्या, "शरद पवार यांना कुणी नास्तिक म्हणत असतील तर ते योग्य नाही. नुकतंच मी सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात गेली असता तेथील अध्यक्षांनी तुम्ही दुसऱ्यांदा येथे आलात. अजित पवारही दोनवेळा आलेत. तर शरद पवार येऊन गेले असून, त्यांनी या मंदिरासाठी निधीही दिला असल्याचं सांगितलं”.

राज ठाकरे यांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतला असल्याचे तसेच अनेक मंदिरात त्यांनी पुजा केल्याचे फोटो व्हायरल झालेत.

Web Title: Ashadi Ekadashi Sharad Pawars Atheist Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..