आशिष देशमुख पुन्हा पक्षांतराच्या वाटेवर? सुनील केदार यांच्यामुळे नाराज?

आशिष देशमुख यांची राजकीय कारकिर्द जाणून घ्या
आशिष देशमुख
आशिष देशमुख sakal

इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. राज्यातील उमेदवार न दिल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. सोबतच सोनिया गांधी वर कुणाचा तरी दबाव असल्याचं म्हणत काँग्रेसचे महासचिव आशिष देशमुख यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे आणि पदाचा राजीनामा दिला. मात्र आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. काँग्रेसच्या अंतर्गत वादातून सतत चर्चेत येणारे आशिष देशमुख यांची राजकीय कारकिर्द तुम्हाला माहिती आहे का?

आशिष देशमुख
Uddhav Thackeray यांच्यावर टीका करताना Nitesh Rane यांची चीभ घसरली | Sakal Media |

आशिष देशमुख यांची राजकीय कारकिर्द

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुखांचे मोठे पुत्र आशिष देशमुख यांची राजकीय कारकिर्द कायमच चर्चेत राहली. २०१४च्या निवडणुकीपूर्वी आशिष देशमुख यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपने त्यांना काटोलमधून उमेदवारी दिल्यानंतर ते तिथून विधानसभेवर निवडून आले. आशिष देशमुख यांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आपले काका अनिल देशमुख यांचा पराभव केला होता.

त्यानंतर काही वर्षातच त्यांना भाजपची विचारसरणी पटली नाही. सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे आशिष देशमुख यांनी २०१८ साली भाजप ला रामराम ठोकला.

आशिष देशमुख
Electric ST Bus | एसटीची ही इलेक्ट्रिक बस एकदा पाहाच | Sakal Media |

आशिष देशमुख आणि सुनिल केदारांचे अंतर्गत वाद

आशिष देशमुख कायम काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे चर्चेत येत असतात. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा वाद बराच पेटला. सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप देशमुखांनी केला होता. 2002 मध्ये सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवली आणि पूर्ण रक्कम गमवावी लागली. त्यामुळे नागपूर जिल्हा बँकेचे 150 कोटींचे नुकसान झाले असा आरोपही देशमुख यांनी केला होता.

आशिष देशमुख
अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झालेल्या चौंडी गावाबद्दल माहितीये का?

अनिल देशमुखांविरुद्ध आशिष देशमुख

२०१४च्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी राजकारणात प्रवेश करत भाजपनकडून ते काका अनिल देशमुख यांच्या विरोधात लढले होते. आशिष देशमुख यांनी निवडणुकीत काका अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. त्यावेळी ते पुन्हा चर्चेत आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com