"....हे संजय राऊत यांचं कोणतं कर्तुत्व आणि कर्तव्य आहे?", आशिष शेलार यांची टिका

"प्रमोद महाजनांच्या पायाजवळ पोहचण्याची तुमची अजूनही योग्यता आलीय का?"
Ashish Shelar and Sanjay Raut
Ashish Shelar and Sanjay Rautटिम ई सकाळ

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला चिमटा काढत एक जुने व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्यंगचित्रावरून आत भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचं कार्टून जुनं आहे. ते जुनं कार्टून शेअर करण्यात संजय राऊत यांचं कोणतं कर्तुत्व आणि कर्तव्य आहे? असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

Ashish Shelar and Sanjay Raut
Republic Day : दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचे पोस्टर केले जारी

"बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचं एक जुने कार्टून संजय राऊत यांनी आज शेयर केले. कार्टून हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. याला विरोध नाही. मात्र, कार्टूनवरून टीका करायची आणि राग आला तर पळून जायचं. हे संजय राऊत यांचं कोणतं कर्तुत्व आणि कर्तव्य आहे? तुमच्यावरील कार्टून कुणी व्हॉट्सअपवर पाठवलं तर नौदलाच्या अधिकाऱ्याचे तुम्ही डोळे फोडणार आणि दुसऱ्याबाबत मात्र तुम्ही कार्टून पोस्ट करणार. अशी दुटप्पी भूमिका संजय राऊत तुम्ही घेऊ नका. प्रमोद महाजनांच्या पायाजवळ पोहचण्याची सुद्धा तुमची अजूनही योग्यता आलीय का हा आमचा प्रश्न आहे",अशी टीका शेलारांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com