Republic Day : दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचे पोस्टर केले जारी

पोलिस कर्मचारी सर्वत्र तैनात असतील आणि लोकांना अगोदर मास्क काढण्यास सांगतील
Delhi Police released posters of terrorists
Delhi Police released posters of terroristsDelhi Police released posters of terrorists

प्रजासत्ताक दिनापूर्वी (Republic Day) राजधानी दिल्ली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. दोन महिन्यांपासून दिल्लीतील दहशतवादविरोधी कारवायांवर दिल्ली पोलिस आणि सर्व सुरक्षा यंत्रणांचे लक्ष आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिनापूर्वी काही संशयित दहशतवाद्यांचे फोटो जारी (Terrorist poster released) केले आहेत. कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराजवळ लावलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या पोस्टरमध्ये पोलिसांनी त्यांची ओळख उघड केली आहे. लोकांना त्यांच्याविषयी माहिती देण्याचे आवाहन करीत बक्षीसही जाहीर केले आहे. (Delhi Police released posters of terrorists)

गाझीपूर फूल मंडीमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. दिल्लीत लपलेले काही दहशतवादी किंवा स्लीपर सेलचे सदस्य मोठी दहशतवादी योजना राबविण्याचा प्रयत्न करू शकतात, असे मानले जात आहे. हे लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि दिल्लीच्या हॉटस्पॉट्सवर लक्ष ठेवण्यासाठी ६ प्रवेशासह ३० ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. या फेशियल रेकग्निशन सिस्टममध्ये ५०,००० संशयित गुन्हेगारांचा डेटाबेस आहे.

परेड पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी सहा एंट्री पॉईंट्स आणि १६ ब्रिजवर ३० फेशियल रिकॉग्निशन सिस्टम बसवण्यात आली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती या ठिकाणाहून प्रवेश करते तेव्हा सिस्टममध्ये त्याचा चेहरा दिसेल आणि प्रवेश करणारी व्यक्ती संशयास्पद असल्यास सिस्टमवर लाल दिवा दिसेल. पोलिस कर्मचारी सर्वत्र तैनात असतील आणि लोकांना अगोदर मास्क काढण्यास सांगतील, जेणेकरून चेहरा ओळखता येईल, असे दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल म्हणाले.

२७ हजारांहून अधिक पोलिस तैनात

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) सुरक्षेसाठी २७ हजारांहून अधिक पोलिस (Delhi Police) तैनात करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली. दिल्ली नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते, असे ते म्हणाले.

Delhi Police released posters of terrorists
नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘मला विचारून लफडा केला का?

यंदा २७,००० हून अधिक फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. ज्यात दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) कमांडोपासून ते डीसीपी, एसीपी स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय केंद्रीय सुरक्षा दलाच्या ६५ कंपन्याही तैनात आहेत. इतर यंत्रणांचीही मदत घेण्यात आली आहे. सोबतच सोशल मीडिया मॉनिटरिंगच्या माध्यमातून लोकांना जागरूक केले जात आहे, असे राकेश अस्थाना यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com