Ashish Shelar I रुस्तमजीचे महाविकास आघाडीतील कोणत्या मंत्र्याशी लागेबंध?, शेलारांचा रोख कुणावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Shelar

सरकारी जागेची कवडीमोल दरात विक्री केली, शेलारांचा गंभीर आरोप

'रुस्तमजीचे महाविकास आघाडीतील कोणत्या मंत्र्याशी लागेबंध?'

मागील काही दिवसांपासून भाजप मुंबईत पोलखोलचा कार्यक्रम करत आहे. पोलखोच्या माध्यमातून नवनवीन रूप आम्ही समोर आणत आहोत. मुंबईत सरकारी जागांची लयलूट कशी होते हे प्रकरण आता समोर आणणार आहे, असा इशारा भाजपाचे आशिष शेलार यांनी दिला आहे. अल्पसंख्याक समाजाच्या सरकारी जागांवर भ्रष्टाचाराचे कूरण वाढत असून हा विषय गंभीर आहे, असंही ते म्हणाले आहेत. याप्रकरणी शेलार यांनी वांद्रे येथील एका जागेचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारी जागेची कवडीमोल दरात विक्री केली असून एक एकर जागा खासगी विकासकाच्या खिशात घातली असल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी केला आहे.

हेही वाचा: संदीप देशपांडेंच्या अडचणी वाढणार? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

आज ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ही जागा कवडीमोल किमतीला देण्याचा प्रकार सुरु आहे. जे बांधकाम सरकारी जागेवर आहे अशा जागा विकल्या जात आहेत. मुंबईत वांद्रे पश्चिम विभागात बँड स्टँडजवळ उच्च प्रतीच्या आणि दराच्या जागा आहेत. वांद्रेतील ताज हॉटेलच्या बाजूला 1 एकर पाच गुंठे जागा राज्य सरकारची जागा लीजवर आहे. ही जागा एका चॅरिटेबल ट्रस्टला दिली होती. ज्या ट्रस्टची लीज 1980 ला संपली अशी मोक्याची जागा त्यावेळी सरकारने आजारी पडलेल्या लोकांना विश्रातीसाठी दिली होती. ती जागा रुस्तमजी नावाच्या विकासकाला विकण्याचा घाट घातला गेला आणि ती जागा त्यावेळी विकली. त्यामुळे रुस्तमजीला 1 हजार 3 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. 234 कोटी रुपयात विकण्याच्या सर्व परवानग्या त्या ट्रस्टला दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे या रुस्तमजीचे महाविकास आघाडीतील कोणत्या मंत्र्याशी लागेबंध आहेत?, असा सवालही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, ही जागा विकण्याची परवानगी देताच कामा नये. जी जागा सरकारची स्वतःची होती ती जागा ट्रस्टला विकण्याची परवानगी देण्यात आली. हे सर्व प्रकरण संशयित वाटावे अशी चर्चा आहे. वर्ग दोननुसार दिली असती तर सरकारला त्याचा फायदा झाला असता. मुंबई महानगर पालिकेने या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मान्य करू नये. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा: वंचित-काँग्रेसची आघाडी?, कॉंग्रेस नेत्यासोबत आंबेडकरांची गुप्त बैठक

Web Title: Ashish Shelar Criticized To Maha Vikas Aghadi Govt On Land Sale In Minimum Price

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top