उद्धवजी, योगेश सोमण यांच्या पाठिशी उभे राहणार का? : शेलार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मेहक प्रभू मराठी आहे तर मग, योगेश सोमण कोण आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महोदय सोईस्करपणे मराठी माणूस कसा आठवतो आपल्याला?

मुंबई : गांधी घराण्यावर टीका केली म्हणून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले अभिनेते व मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांच्या पाठिशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही उभे राहणार का, असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सोमण यांना सक्तीच्या रजेला तोंड द्यावे लागत आहे. सोमण यांच्यावरील कारवाईचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी समर्थन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला वेठीस धरण्यात आले होते. अननुभवी, अकार्यक्षम आणि अपात्र लोकांची केवळ संघ विचारधारेचे असल्याने महत्वाच्या पदांवरती नेमणूक करुन शिक्षण व्यवस्थेचे संघीकरण करण्याचा भाजपा सरकारचा डाव असतो. योगेश सोमण यांच्यावर झालेली कारवाई ही असहिष्णुता नव्हे तर शिक्षण व्यवस्थेचे शुद्धीकरण आहे, असे त्यांनी म्हटले होते.

शिक्षण व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी सोमणांवरील कारवाई योग्यच : सावंत

आता आशिष शेलार यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारला आहे. त्यांनी म्हटले आहे, की मेहक प्रभू मराठी आहे तर मग, योगेश सोमण कोण आहेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महोदय सोईस्करपणे मराठी माणूस कसा आठवतो आपल्याला? हिंदुत्व जसे सोयीस्कर आठवते तसेच मराठी माणसाचे आपण करणार का? योगेश सोमण यांच्या पाठीशी उभे राहणार का?

गांधींवर टीका केली अन् योगेश सोमणांना पाठविले सक्तीच्या रजेवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashish Shelar targets CM Uddhav Thackeray on Yogesh Soman