Maharashtra Politics: अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर...;आशिष शेलारांच सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics: अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर...;आशिष शेलारांच सूचक विधान

Maharashtra Politics: अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर...;आशिष शेलारांच सूचक विधान

भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची एक क्लिप जाहीर केली तर अडचण होईल असं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हंटल आहे. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांना सूचक इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर आशिष शेलार यांनी हा इशारा दिला आहे. आशिष शेलार बोलताना म्हणाले की, अशोक चव्हाण यांची एक क्लिप जर आम्ही जाहीर केली तर त्यांची अडचण होईल. ते आमचे मित्र आहेत ते त्यांची अडचण आम्हाला करायची नाही. ज्यामध्ये राजकीय संदेश, प्रथा परंपरा असतात त्या प्रथा परंपराचा आम्ही भंग करणार नाही. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावरील टीका टिप्पणी नाही पण त्यांच्या राजकीय गोष्टींवर आम्ही नक्कीच बोलु शकतो असंही ते म्हणालेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने फडणवीस सरकारच्या काळात आमच्याकडे प्रस्ताव दिला होता. शिवसेनेचे जे शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते त्यामध्ये एकनाथ शिंदे हे पण होते असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी केला होता त्यानंतर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. त्याला शिवसेना नेत्यांनीही दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Ashish ShelarAshok Chavan