अशोक चव्हाण अखेर पायउतार; बाळासाहेब थोरात नवे प्रदेशाध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 July 2019

बाळासाहेब थोरात नवे प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या जोडीला चार कार्याध्यक्ष देत सामाजिक व प्रादेशिक संतुलन साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते .

मुंबई : लोकसभेतील दारूण पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ सुरू असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे. विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणत्याही क्षणी घोषणा होवू शकते असे काँग्रेसच्या सुत्रांची खात्रीलायक सांगितले. 

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीवाम्यावर ठाम असून देशभरात विविध वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी राजीनामा सत्र सुरु केले आहे. अशोक चव्हाण यांनीही राज्यातील पराभवाची व स्वत:च्या पराभवाची जबाबदारी स्विकारून काही दिवसांपुर्वी राजीनामा दिला होता. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते राजीनाम्यावर ठाम असल्याने दोन दिवसांपुर्वीच त्यांचा राजीनामा स्विकारला असल्याचे समजते. 

बाळासाहेब थोरात नवे प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या जोडीला चार कार्याध्यक्ष देत सामाजिक व प्रादेशिक संतुलन साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan step down as Maharashtra congress president post Balasaheb Thorat new president