राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी : अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 November 2019

- काँग्रेसचे सरकार आल्यानंतर अतिरिक्त मदतीची घोषणा

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मात्र, प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी २ हेक्टरपर्यंत ८ हजार प्रती हेक्टर तर फळबागा व बारमाही पिकांसाठी १८ हजार रूपये प्रती हेक्टर मदत देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले, की पावसाने केलेले प्रचंड नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. मात्र, राज्यपालांनी आज जाहीर केलेली मदत पुरेशी नाही. तरीही राज्यात सरकार अस्तित्वात नसताना जाहीर झालेल्या या मदतीचे प्रशासनाने तातडीने वितरण करावे.

काळ्या पैशांबाबत लवकरच होणार 'ही' घोषणा

सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करून अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा सहभाग असलेले सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या या मदतीत अधिक वाढ केली जाईल, असे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan talked about Financial Assist declared by Governor