तरुणांनी UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, पण त्याचबरोबर राजकारणातही उतरावं, असा सल्ला भाजप नेते अशोक चव्हाण यांनी तरुणांना दिला आहे. अशा तरुणांनी राजकारणात प्रवेश केल्यास राजकारणाचा स्तर निश्चितच उंचावेल आणि आजच्या परिस्थितीत त्याची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले. पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले.