

Allegations of sexual exploitation against Ashok Kharat spark political controversy, with Rupali Thombre Patil questioning the role of Women Commission Chairperson Rupali Chakankar.
esakal
नाशिकमधील अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक माहिती समोर आहे. मात्र महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी अशोक खरातला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेच अभय होते का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. आहे महिला आयोगाकडे वर्षभरापूर्वी खरात विरोधात तक्रार करण्यात आली होती मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, त्याची चौकशी तेव्हाच केली असती तर आता पीडित महिलांची संख्या वाढली नसती असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.