

Ashok Kharat
esakal
नाशिक : भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांत आणखी एक गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यासह खरात याच्याविरोधात नाशिकमध्ये आता एकूण आठ गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, वावी पोलिसांत ज्या व्यक्तीविरुद्ध खरात याने खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, त्याच व्यक्तीने आता खरात यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.