
रायगड किल्ल्यावर असलेल्या धनगर समाजाच्या वस्तीला पुरातत्व खात्यानं नोटीस पाठवली असून गड रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय पुरतात्व खात्याकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसीमुळे गेल्या ७ पिढ्यांपासून गडावर राहणाऱ्या धनगर समाजाच्या लोकांवर बेघर होण्याची वेळ येऊ शकते. रायगड हा राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून संरक्षित आहे. एएसआयच्या नियमानुसार गडावर कोणतंही अतिक्रमण किंवा नवं बांधकाम बेकायदेशीर असल्यानं धनगर वस्तीतील लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.