esakal | शरद पवारांनी ट्विट करत ममता बॅनर्जींना दिल्या शुभेच्छा

बोलून बातमी शोधा

sharad pawar and mamta banergee
शरद पवारांनी ट्विट करत ममता बॅनर्जींना दिल्या शुभेच्छा! काय म्हणाले...
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. राज्यात 208 जागांसाठी 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. ममता बॅनर्जी हॅट्रिक करणार की भाजप सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने 200 जागांचा टप्पा पार केला आहे. तृणमूल काँग्रेस 208 जागांवर पुढे असून भाजपची आघाडी 80 जागांवर आली आहे. यानुसार राज्यात तृणमूल काँग्रेसची लाट कायम असून पुन्हा ममता बॅनर्जी विजयाची हॅटट्रिक करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्वीट करत पश्चिम बंगाल निवडणुकीतील विजयबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले शरद पवार...

अभिनंदन @MamataOfficial तुमच्या जबरदस्त विजयासाठी! लोकांच्या कल्याणासाठी आणि महामारीला सामोरे जाण्यासाठी आपले कार्य चालू ठेवूया.

सध्या सर्वांचे लक्ष पश्चिम बंगालमधील नंदीग्रामच्या जागेवर लागले होते. इथे तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि भाजपा उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु होता.

हेही वाचा: Live: तृणमूल कार्यकर्त्यांचा जल्लोष; निवडणूक आयोग आक्रमक

केरळ निवडणुकीच्या विजयावर शरद पवार म्हणाले...

अभिनंदन @vijayanpinarayi केरळ निवडणुकीत सलग ऐतिहासिक विजय. आपण एकत्र या निवडणुका लढल्या आणि आता एकत्रितपणे आपण कोविड विरुद्ध लढा देऊ!