West Bengal : ममतांचा पराभव; विजयानंतर सुवेंदू अधिकारींची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mamta banarjee

ममतांचा पराभव; विजयानंतर सुवेंदू अधिकारींची प्रतिक्रिया

सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. राज्यात 294 जागांसाठी 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. सत्ता स्थापनेसाठी 148 जागांची आवश्यकता होती. तृणमूलने राज्यात स्पष्ट बहुमत मिळवलंय. पण, ममतांना नंदीग्राममध्ये पराभव स्वीकारावा लागलाय.

निवडणुकीच्या लाइव्ह अपडेट्स रात्री 9 वाजेपर्यंतच्या असून यापुढील अपडेट आणि इतर घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

मी बंगालच्या जनतेचे आभार मानतो. त्यांच्या प्रेमामुळे आणि समर्थनामुळे मी आज आमदार होऊ शकलो. मी अविरत जनतेची सेवा करत राहीन, असं विजयी उमेदवार सुवेंदु अधिकारी म्हणाले आहेत.

मला निकाल मान्य आहे, पण आपण कोर्टात जाणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर काही फेरफार करण्यात आल्याचा आरोप करत सत्य शोधणार असल्याचं ममता म्हणाल्या आहेत.

आरामबाग येथील भाजपच्या कार्यलयाला आग लावण्यात आली आहे. याठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. याआधी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कोलकाताच्या भाजप प्रदेश कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ''मी सर्वांचे आभार मानते. मी सर्वांना विनंती करते की त्यांनी विजयोत्सव करु नये. सर्वांनी घरी जावं. मी माध्यमांशी सहानंतर संवाद साधेल. पश्चिम बंगालच्या जनतेचा विजय असो, असं त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून विजय प्राप्त केलाय. त्यांनी भाजपचे सुवेंदु अधिकारी यांचा 1200 मतांनी पराभव केला आहे. ममतांनी सुवेंदु अधिकारी यांच्या नंदीग्राम मतदारसंघात जाऊन थेट सुवेंदू यांना आव्हान दिले होते. अटीतटीच्या राहिलेल्या या लढतीत ममतांनी अखेर विजय प्राप्त केलाय.

15 व्या फेरीअखेर ममता बॅनर्जी 8000 हजार मतांनी आघाडीवर आहेत, भाजपच्या सुवेंदु अधिकारी यांना त्यांनी मागे टाकले आहे. सुरुवातीच्या फेरीनंतर सुवेंदु अधिकारी यांनी आघाडी घेतली होती. पण, त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पकड घेतली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन ममता बॅनर्जी यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केलंय. ममतांनी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवलाय. केजरीवाल यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचेही अभिनंदन केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी तृणमूलच्या विजयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. लोकांप्रती आपले काम आपण सुरु ठेवू आणि कोरोना काळातून बाहेर पडू असं ते म्हणाले आहेत. शरद पवार यांनी निवडणुकाआधी ममतांना पाठिंबा जाहीर केला होता.

सुरुवातीच्या कलानुसार, तृणमूल काँग्रेसने 202 जागांवर आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला असून ते अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरले आहे. कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अशा प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याचे निलंबन करणार असल्याचे सांगितले आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, असं वक्तव्य केलं होतं. पण, सध्याच्या कलानुसार भाजप 77 जागांवर आघाडीवर आहे. यापार्श्वभूमीवर तृणमूलने नेते डेरेन ऑबेरायन यांनी अमित शहांचा एक व्हिडिओ शेअर करत खिल्ली उडवली आहे

पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी सहाव्या फेरीत पुन्हा आघाडी घेतली आहे. ममतांनी 1500 मतांची आघाडी घेतली आहे. भाजपचे सुवेंदू अधिकारी आणि ममता यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसने 200 चा आकडा पार केला आहे.

284 जागांचे कल हाती आली असून ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत येणाना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने 202 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजप 77 जागांवर आघाडीवर आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कोलकातामध्ये जल्लोषाला सुरुवात केली आहे.

आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपला 37.3 टक्के मतं मिळाली आहेत, तर तृणमूल काँग्रेसला 48.4 टक्के मतं मिळाली आहेत. भाजप सध्या 93 जागांवर आघाडीवर असून तृणमूल 196 जागांवर आघाडीवर आहे

सुरुवातीच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूलने 196 जागांवर आघाडी घेतली असून स्पष्ट बहुमत प्राप्त केलय. दुसरीकडे भाजपनेही मोठी मुसंडी मारली असून 94 जागांवर आघाडी घेतली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडे केवळ 3 जागा होत्या.

 • सलग दुसऱ्य़ा फेरीनंतर ममता बॅनर्जी पिछाडीवर पडल्या आहेत. सुवेंदू अधिकारी यांना चांगली आघाडी मिळताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून 194 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजप 93 जागांवर आघाडीवर आहे.

 • टोलागंजमधून तृणमूल काँग्रेसचे अरुप बिस्वास आघाडीवर असून त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना मागे टाकले आहे

 • भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सुरुवातीच्या कलांवर प्रतिक्रिया दिली. आताच भाष्य करणे चुकेचे ठरले. संध्याकाळपर्यंत स्थिती स्पष्ट होईल. आम्ही 3 पासून सुरुवात केली होती आणि आता 100 च्या पुढे जात आहोत. आम्ही बहुमताचा आकडाही नक्की पार करु, असं ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: ममता बॅनर्जींना चॅलेंज देणारे सुवेंदू अधिकारी आहेत तरी कोण?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये धक्का बसताना दिसत आहेत. ममता सलग दुसऱ्या फेरीत पिछाडीवर पडल्या आहेत. भाजपचे सुवेंद्र अधिकारी यांनी 3,400 मतांनी आघाडी घेतली आहे. असे असले तरी सुरुवातीच्या कलानुसार तृणमूलने बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचली आहे. तृणमूल काँग्रेस 134 जागांवर आघाडीवर असून भाजप 116 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 6 जागांवर पुढे आहे

west bengal result

west bengal result

 • नंदीग्राममध्ये पहिल्या फेरीतील मतमोजणी पार पडली असून ममता बॅनर्जी 1,400 मतांनी पिछाडीवर पडल्या आहेत. कधीकाळी त्यांचे सहकारी असणारे आणि सध्या भाजपवासी झालेली सुवेंदू अधिकारी यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहेत.

 • पश्चिम बंगालमधील सुरुवातीच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेस बहुमताच्या जवळ गेली असून 127 जागांवर आघाडीवर आहे, दुसरीकडे भाजपनेही चांगली मुसंडी मारली असून 109 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपला 2016 विधानसभा निवडणुकीत 3 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी भाजपने नेत्यांनी बंगालमध्ये चांगला जोर लावला होता. त्यामुळे त्यांना त्याचे फळ मिळताना दिसत आहेत.

 • नंद्रीग्राममधून मोठी माहिती हाती येत असून तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी 1500 मतांनी पिछाडीवर गेल्या आहेत, तर भाजपचे सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहे. ममता आणि सुवेंदू यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत असून प्रत्येक फेरीनुसार चित्र बदलताना दिसत आहे. नंद्रीग्राम मतदारसंघातून ममतांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. भाबानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा मूळ मतदारसंघ आहे. पण त्यांचे जवळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी तृणमुलला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी ममतांनी भाबानीपूर ऐवजी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या नंदीग्राममधून आघाडीवर आहेत.

बंगालमधील अन्य महत्त्वाचे कल

 • बंगाल सरकारमधील मंत्री आणि तृणमुलचे नेते मोलोय घातक आसनसोल उत्तरमधून आघाडीवर आहेत.

 • पोस्टल मतमोजणी सुरु झाल्यानंतर ताराकेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे स्वप्न दासगुप्ता आघाडीवर आहेत.

 • कृष्णनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकूल रॉय आघाडीवर आहेत.

 • पहिले कल हाती आले असून तृणमूल काँग्रेस 94 जागांवर आघाडीवर असून भाजप 100 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 6 जागांवर पुढे आहे

काँग्रेस एजेन्ट गोपाल सोम याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. मतमोजणी सुरु असताना तो अचानक बेशुद्ध पडला. पाणीहाटीचे उमेदवार तपस मुजुमदार यांच्यावतीने एजेन्ट मतदान केंद्रामध्ये आला होता.

 • पहिले कल हाती आले असून तृणमूल काँग्रेस 94 जागांवर आघाडीवर असून भाजप 100 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 6 जागांवर पुढे आहे

 • नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर असून भाजपचे शुभेंदू अधिकारी पिछाडीवर गेले आहेत. तृणमूलच्या प्रमुख यांच्यासमोर शुभेंदू यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. नंदीग्राममध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे

 • टोलिगंज मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात ममता बॅनर्जींच्या सरकारमधील अरूप बिस्वास उभे आहेत. सुप्रियो यांचा टोलेगंजमध्ये दबदबा असून बंगाल सिनेसृष्टीतील कलाकार म्हणून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

हेही वाचा: Live: अण्णा द्रमुक सत्ता राखणार की द्रमुक मारणार बाजी?

हेही वाचा: Live : केरळमध्ये काँग्रसेची मुसंडी; आसामध्ये भाजप आघाडीवर

 • पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे

एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगाल पुन्हा बाजी मारणार असा अंदाज व्यक्त कऱण्यात आला आहे. बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 ही मॅजिक फिगर गाठावी लागेल. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार टीएमसीला 152 ते 164 जागा मिळतील तर भाजप 109 ते 121 जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये खरी लढत ही ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप अशीच बघायला मिळाली. पंतप्रधान मोदींनी कोलकात्यात झालेल्या सभेत म्हटलं होतं की, लोकसभेत टीएमसी हाफ आणि यावेळी पूर्ण साफ. तर नंदीग्रमा इथं ममता बॅनर्जी यांनी भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर देताना व्यासपीठावर चंडी पाठ करून स्वत: हिंदू असल्याचं सांगितलं होतं.

दोन जागांसाठी 16 मे रोजी मतदान

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. यापैकी 292 जागांवर मतदान घेण्यात आलं आहे. दोन जागांसाठी 16 मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, त्याआधीच आज राज्याचा निकाल स्पष्ट होणार आहे. मुर्शिदाबाद आणि जंगीपूर इथल्या दोन उमेदवारांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे दोन्ही जागांची निवडणूक रद्द करावी लागली होती.

Web Title: West Bengal Assembly Election 2021 Result Live Updates Tmc Bjp Congress Mamata Banarjee Suvendu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top