Friends Forever: दोस्तांची जिगरी! 30 वर्षापूर्वीच्या मित्राला भेटण्यासाठी गोव्याचे विधानसभा अध्यक्ष पंढरपूरात

मिरज येथे बीपीएड केले एकत्र; मैत्रीचे बंधन जोपासण्यासाठी अनोखा प्रयत्न
Friends Forever
Friends ForeverEsakal

मिरज येथे बीपीएडचे शिक्षण घेत असताना झालेल्या मैत्रीचे बंध जोपासण्यासाठी गोवा राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर हे सुमारे चारशे किलोमीटरचा प्रवास करत भोसे (ता. पंढरपूर) येथे आले होते. मराठमोळ्या पद्धतीने केलेल्या स्वागताने आणि अनेक वर्षांच्या भेटीनंतर अध्यक्ष श्री. तवडकर आणि त्यांचे सहाध्यायी मित्र भारावून गेले.(Latest Marathi News)

भोसे येथील व्यावसायिक विश्वनाथ भिंगारे हे १९९२ - ९३ साली मिरज येथे बीपीएड शिक्षण घेण्यासाठी गेले होते. त्या बॅचमधील सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या मैत्रीचा जिव्हाळा कायम ठेवला होता. त्याकाळी पत्रव्यवहार, दूरध्वनी करून सर्वांनी आपली मैत्री जोपासली होती.(Marathi Tajya Batmya)

सध्याच्या डिजिटल युगामध्ये मोबाईलमुळे जग मुठीत आल्याचा फायदा या बॅचच्या मुलांनीही घेतला होता. हे सर्व मित्र मोबाईलद्वारे सतत संपर्कात होते. मात्र फोनवर बोलण्यापेक्षा सर्वांनी एकदा एकत्र यावे, या हेतूने ओझेवाडी येथील मोहन क्षीरसागर आणि भोसे येथील विश्वनाथ भिंगारे यांनी या बॅचचे गेटटुगेदर करण्याचे नियोजन केले. त्यानुसार हे सर्व मित्र अनेक वर्षातून आज भेटले. शनिवारी ओझेवाडी येथे मोहन क्षीरसागर यांच्या घरी श्री. तवडकर यांनी पाहुणचार घेतला. त्यानंतर आज सकाळी अकरा वाजता भोसे येथे विश्वनाथ भिंगारे यांच्या दुकानी भेट दिली.(Latest Marathi News)

Friends Forever
Pradip Kurundkar Case : तिच्या बोलण्यावर भाळला अन् नको ते सांगून बसला, DRDO चा शास्त्रज्ञ कसा फसला?

यावेळी क्रीडा विभागाचे माजी उपसंचालक जनक टेकाळे, बीपीएड कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य अशोक काळे, पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सरपंच गणेश पाटील, सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, प्रा. अर्जुन पाटील, राजू कदम, मुन्ना आलासे, केंद्रीय समन्वयक संजय हिरेकर, प्रा. सुनील गौड, कुमार बोराडे, विजय बोराडे, प्रदीप पाटील (विसापूर), पोपट कोळी (रत्नागिरी) उपस्थित होते.(Marathi Tajya Batmya)

Friends Forever
Ajit Pawar: '...खोके घेतले असतील तर मी...', त्या वक्तव्यावर पवार संतापले

यावेळी महेश पाटील (अकोले खु.), दादा फाटे (गादेगाव), मारुती गायकवाड (पेहे), जालिंदर गायकवाड (चळे), चंद्रकांत गीते, आदिनाथ देवकते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल खरात, जयवंत गावंधरे, माजी सरपंच मोहन तळेकर, सुनील तळेकर, मारुती कोरके, नारायण कोरके, संजय तळेकर, भारत कोरके, प्रा. महादेव तळेकर, ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णात माळी, नामदेव कोरके, रामदास कोरके, धनंजय तळेकर यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ भिंगारे यांनी केले. सूत्रसंचालन जीवन घोडके यांनी केले.(Latest Marathi News)

Friends Forever
Sharad Pawar: पवारांची भाकरी सोलापूरात करपली? भालकेंची नाराजी राष्ट्रवादीला पडणार महागात?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com