
पुणे - कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, पण टेस्ट पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण राज्यात 63 टक्के आहे. अशा रुग्णांवर प्रभावी उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करणे शक्य असते, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
राज्यात शुक्रवारी (ता. 24) सकाळपर्यंत सहा हजार 427 रुग्णांची नोंद सार्वजनिक आरोग्य खात्यात झाली आहे. त्यापैकी सुमारे 63 टक्के रुग्णांना कोरोनाचे कोणतेही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. पण, त्यांच्या घशातील द्रव पदार्थांच्या प्रयोगशाळेतील तपासणीतून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. अशा रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे विश्लेषण आरोग्य खात्याने केले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यांना ठेवतात विलगीकरण कक्षात
कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला विलगीकरण कक्षात दाखल केले जाते. त्यात त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र, घराच्या शेजारील, त्याच्या कामाच्या ठिकाणचे सहकारी अशा सगळ्यांचा यात समावेश असतो. हा रुग्ण ज्यांना कोणाला भेटला, त्यांची तपासणी केली जाते. यापैकी बहुतांश जणांना कोरोनाची कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत.
असे होतात लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह
कोरोनाची प्रयोगशाळेतील तपासणी अत्यंत काटेकोर केली जाते. त्यासाठी रुग्णाची माहिती स्वॅबसोबत पाठविण्यात येते. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना संसर्गाची शक्यता वाढलेली असते. त्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळेत चाचणी होते. राज्यातील सर्व प्रयोगाशाळांमधून "रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टीड पॉलिमरेज चेन रिऍक्शहन' (आरटी-पीसीआर) या पद्धतीने चाचणी केली जाते. तपासण्यासाठी घेतलेल्या स्वॅबच्या नमुन्यात विषाणूच्या आरएनडीची एक कॉपी असेल तर ती संख्या आरटी-पीसीआरच्या मदतीने वाढविण्यासाठी 40 पर्यंत त्याच्या फेऱ्या घेतल्या जातात. या प्रत्येक फेरीत आरएनएची संख्या दुप्पट होते. पीसीआर केल्यानंतर किती फेऱ्यांमध्ये आरएनडीची अपेक्षित संख्या आली, त्या आधारावर त्या चाचणीची गुणवत्ता ठरते. त्यातून रुग्णाच्या शरीरातील विषाणू नेमका कोणत्या प्रकारचा आहे, याचे निश्चित निदान होते. ही चाचणी अत्यंत संवेदनशील असल्याने कोरोनाचा विषाणूंचा रुग्णाच्या शरीरात प्रवेश झाल्यानंतरही त्याचे निदान होते.
लक्षणे नसलेले रुग्ण म्हणजे काय?
कोरनाचा संसर्ग झाला पण, त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाही. त्याला वैद्यकीय परिभाषेत असिम्टेमॅटिक पॉझिटिव्ह पेशंट म्हटले जाते. त्यांना उचाचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांना तातडीने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध देतो.
उपचार कसा केला जातो?
लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णाच्या सुरुवातीला वैद्यकीय चाचण्या करतात. त्यातून, रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण, यासह हृदय, श्वसन संस्था यांचे कार्य तपासण्यासाठी चाचण्या केल्या जातात. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेऊन उपचार केले जातात.
असे असतात "हॅपी हायपॉक्सिया'
रुग्ण व्यवस्थित सामान्य माणसाप्रमाणे बोलत असतो. त्याला कोणताही विशेष त्रास जाणवत नसतो, किंवा त्याला कोरोनाच्या संसर्गाची स्पष्ट लक्षणेदेखील दिसत नसतात. त्याला बोलताना दमसुद्धा लागत नाही. पण, त्या रुग्णाचे पल्सऑक्सिमीटरवर रक्तातील प्राणवायूचे प्रमाण तपासले तर ते 70 ते 74 टक्क्यांपर्यंत कमी झालेले असते. अशा रुग्णांना हायपॉक्सिया म्हणतात. त्यामुळे अशा रुग्णांवर रुग्णालयात वॉर्डमध्ये दाखल करून उपचार करण्यात मर्यादा असतात. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करणे गरजेचे असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.