
धक्कादायक! राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला
उस्मानाबाद मधून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. उस्मानाबादच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर काल रात्री एका अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला.
या हल्ल्यात त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. या प्रकारानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामागे जिल्हा परिषदेचा बडा अधिकारी असल्याचा त्यांनी दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
मनीषा राखुंडे पाटील या मंगळवारी संध्याकाळी घरी असतांना चेहेरा कपड्याने गुंडाळलेल्या एका अज्ञात व्यक्तीने संधी साधत घरात प्रवेश केला.
त्याने एका हताने चिठ्ठी देऊन दुसऱ्या हाताने चाकू काढून हल्ला केला.
या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली. त्यां मोठ्याने ओरडल्याने शेजारील नागरिक घरी आले. तोपर्यंत हल्लेखोर पळून जाण्यास यशस्वी झाला.
नागरिकांनी पाटील यांना घेवून जात आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.