Eknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Bangar

Eknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला

अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे हल्ला करण्यात आला. (Santosh Bangar news in Marathi)

हेही वाचा: "दसरा मेळाव्यांचं राजकारण न करण्याचा राज यांनी दिला होता CM शिंदेंना सल्ला, पण..."

आमदार संतोष बांगर अमरावती येथील अंजनगावसुर्जी येथे गेले असताना त्यांच्यावर स्थानिक शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा देत हल्ला करण्यात आला. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहे.

मागील अनेक दिवसांपासून संतोष बांगर हे चर्चेत आहेत. बांगर हे सुरुवातीला शिवसेना गटात होते. मात्र ऐनवेळी ते शिंदे गटात सामील झाले. तसेच त्यांनी मुंबईत शिक्तीप्रदर्शन देखील केले होते. या व्यतिरिक्त ते उद्धव ठाकरे गटावर टीका करताना देखील दिसून आले होते.

हेही वाचा: Devendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात?

दरम्यान अमरावतीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अद्याप बांगर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र शिंदे गटाच्या नेत्यावर हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याआधी उदय सामंत याच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाला होता.