वाद पेटला! अमरावतीत राज्यपाल कोश्यारींना जोडे दाखवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagat Singh Koshyari

वाद पेटला! अमरावतीत राज्यपाल कोश्यारींना जोडे दाखवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी...

अमरावती - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मागील काही दिवसांपासून सातत्याने विरोध होत आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे कोश्यारी यांच्या कार्यक्रमांना विरोध होतोय. शिवाय कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलने होतायत. त्यातच आज अमरावती येथे कोश्यारी यांना जोडे दाखविण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आला. (Bhagat Singh Koshyari news in Marathi)

हेही वाचा: Jaykumar Gore: जयकुमार गोरेंच्या Fortuner गाडीला अपघात, जाणून घ्या किती सुरक्षित आहे ही एसयूव्ही?

अमरावती येथे राज्यपाल कोश्यारी आले असता ठाकरे गटाकडून राज्यपालांना जोडे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांना जोडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. तसेच कार्यकर्त्यांनी राज्यपाल विरोधी घोषणा दिल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा: Anna Hajare : अण्णा गप्प का, असा प्रश्न...; भूखंड घोटाळ्याच्या मुद्द्यावर संजय राऊत भडकले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आज अमरावती दौऱ्यावर आहेत. सीमालगतच्या गावांमधील समस्यांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे आहेत. मात्र त्याआधीच अमरावतीत निषेध आंदोलन सुरू झाले. राज्यपालांच्या बैठकीच्या काही अंतरावर आंदोलन झाले. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.