जयकुमार गोरेंच्या Fortuner गाडीला अपघात, जाणून घ्या किती सुरक्षित आहे ही एसयूव्ही? | Jaykumar Gore | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jaykumar Gore

Jaykumar Gore: जयकुमार गोरेंच्या Fortuner गाडीला अपघात, जाणून घ्या किती सुरक्षित आहे ही एसयूव्ही?

Toyota Fortuner Safety Features: भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. गाडी पुलावरून 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली.

सुदैवाने या अपघातात जयकुमार गोरे थोडक्यात बचावले. या अपघातात गोरे यांच्यासह चारजण जखमी झाले आहेत. मध्यरात्री रात्री हा अपघात झाला. दरम्यान, कोणत्याही अपघातानंतर गाडीच्या सेफ्टी फीचर्सविषयी चर्चा सुरू होते. टोयोटा फॉर्च्यूनरला (Toyota Fortuner) सेफ्टी फीचरमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहेत.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Toyota Fortuner चे सेफ्टी फीचर्स

भारतीय बाजारात Toyota Fortuner वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. या गाडीची बाजारातील किंमत ३२ लाख रुपयांपासून ते ५० लाख रुपयांपर्यंत आहेत. फॉर्च्यूनर अनेक शानदार फीचर्ससह येते. सेफ्टी फीचर्ससाठी गाडीला ANCAP ने ५ स्टार रेटिंग देखील दिले आहे.

गाडीच्या बेसिक मॉडेलबद्दल सांगायचे तर यात अनेक शानदार सेफ्टी फीचर्स मिळतात. यात ७ एअरबॅग्स दिल्या आहेत. ड्राइव्हर, पॅसेंजर, २ कर्टन, Driver Knee, ड्राइव्हर साइड, फ्रंट पॅसेंजर साइडला एअरबॅग्स मिळतात. यामुळे अपघातानंतर देखील प्रवासी आणि चालक दोघांना इजा होण्याची शक्यता कमी होते.

हेही वाचा: Wrong Fuel In Bike: गाडीत पेट्रोलऐवजी डिझेल भरले तर? नुकसान टाळण्यासाठी त्वरित करा 'हे' काम

याशिवाय, सीट बेल्ट वॉर्निंग, चाइल्ड लॉक, चाइल्ड सीटसाठी अँकर पॉइंट्स, ओव्हरस्पीड वॉर्निंग, स्पीड सेंसिंग डूर लॉक, अँटी-थेफ्ट इंजिन इमोबिलायझर, मिडल-रियर थ्री-पॉइंट सीटबेल्ट आणि सेंट्रल लॉकिंग सारखे शानदार हेल्थ फीचर्स यात दिले आहेत.

हेही वाचा: Best in 2022: 'या' ५ स्मार्टवॉचला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लागली रांग, किंमत तुमच्या बजेटमध्ये