'24 तासांत हजर व्हा, अन्यथा...'; 2296 एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टीमेटम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'24 तासांत हजर व्हा, अन्यथा...'; 2296 एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम

'24 तासांत हजर व्हा, अन्यथा...'; 2296 एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम

मुंबई: 24 तासांत कामावर हजर राहा नाहीतर सेवासमाप्ती केली जाईल'', अशी नोटीस एसटी कर्मचाऱ्यांना दिली गेली आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. 2296 रोजंदारी कर्मचाऱ्यांना अशी सेवासमाप्तीची नोटीस बजावली आहे.

हेही वाचा: राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा होणार सुरु?; बैठकीत संकेत

एसटी महामंडळाने यासंदर्भातील इशारा आधीपासूनच दिला होता. कामावर रुजू व्हा, अन्यथा सेवा समाप्ती करु, असं याआधीच इशारा देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने दोन हजार 296 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. 24 तासांत कामावर हजर व्हा, अन्यथा कारवाई होईल, असा अल्टिमेटम कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. यामध्ये चालक, वाहक, लिपीक आणि टंकलेखक यांचा देखील समावेश आहे.

loading image
go to top