राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा होणार सुरु?; अजित पवारांच्या बैठकीत संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School
राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा होणार सुरु?; बैठकीत संकेत

राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा होणार सुरु?; बैठकीत संकेत

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळं सध्या बंद असलेल्या पहिले ते चौथी पर्यंतचे वर्ग येत्या काळात सुरु होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून कळते. या बैठकीला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागाचे सचिव उपस्थित होते.

हेही वाचा: तालिबानमुळे अफगाणिस्तान क्रिकेट धोक्यात, ICC ने घेतला मोठा निर्णय

मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. सध्या राज्यात शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु आहेत. तर ग्रामीण भागात पाचवीपासून बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. सध्या राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्यानं आता पहिलीपासून पुढील सर्व वर्ग सुरु करण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.

हेही वाचा: कोल्हापूरमध्ये ड्रग्ज तयार करणारं युनिट उद्ध्वस्त; अडीच कोटींचा माल जप्त

दरम्यान, या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभागही प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतू, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर येत्या १५ दिवसांत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

loading image
go to top