Atul Bhatkhalkar l तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे राजकीय नौटंकी-अतुल भातखळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul-Bhatkhalkar

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भेट ही राजकीय नौटंकी आणि फोटोचा कार्यक्रम.

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे राजकीय नौटंकी-अतुल भातखळकर

मुंबई: केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telagana CM K Chandrashekhar Rao) यांनी दिल्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तेलंगणाच्या (Telangana) मुख्यमंत्र्यांशी घेतलेली आजची भेट म्हणजे दोघांमध्ये जास्तवेळ कोण घरी राहतं याची चाचपणी करण्यासाठी ही भेट घेण्यात आली असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला. त्यांनी या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा: PM मोदींच्या आरोपावर यशोमती ठाकूरांचे प्रत्यूत्तर; म्हणाल्या...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना भातळकर म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भेट ही राजकीय नौटंकी आणि फोटोचा कार्यक्रम होता, एवढाच या भेटीचा अर्थ आहे. महाराष्ट्राच्या जनतेला या भेटीतून काहीही मिळाले नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची परवानगी घेतली होती का? असा सवालही यावेळी उपस्थित केला. शिवसेनेला यूपीत घेणार होते हे जनतेला सांगाव. शिवजयंतीला घरा बाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना, एसटी च्या प्रश्नावर कर्मचाऱ्यांना भेटायला वेळ नाही. मात्र, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ मिळतो. यातून महाराष्ट्राच्या राजकारणाची किती दयनीय अवस्था झालीय हेच सिध्द होत आहे असेही ते म्हणाले.

Web Title: Atul Bhatkhalkar React K Chandrashekar Rao And Uddhav Thackeray Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top