
ठाणे: केवळ अनुसूचित जाती वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ यापुढे आता सरसकट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि सातत्याने भक्कमपणे कर्मचाऱ्यांची बाजू मांडल्याने ठाणे शहरासह राज्यातील सुमारे ५० हजार सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.