esakal | पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर, जाणून घ्या कोणते?
sakal

बोलून बातमी शोधा

Education News

इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीकरिता प्रत्यक्ष वर्ग अध्यापन शक्य झाले. कोरोनाकाळात विद्यार्थी शाळा बाह्य होवू नये, म्हणून शिक्षण विभागाने विविध माध्यमाच्या साहायाने ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे प्रयत्न केले.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर, जाणून घ्या कोणते?

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोना परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नती देण्यासाठी शिक्षण विभागाने नियमावली जाहीर केली आहे. यंदा कोरोनामुळे पहिली ते चौथीच्या शाळा वर्षभर सुरु झाल्या नाहीत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीकरिता प्रत्यक्ष वर्ग अध्यापन शक्य झाले. कोरोनाकाळात विद्यार्थी शाळा बाह्य होवू नये, म्हणून शिक्षण विभागाने विविध माध्यमाच्या साहायाने ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे प्रयत्न केले. ते अद्यापही सुरुच आहेत. बहुतांश शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन केले आहे. मात्र, अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन केलेले नाही. त्यासाठी शासनाने वर्गोन्नतीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

धक्कादायक! कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे कळताच उडाला एकच गोंधळ, अनेकांनी काढला पळ  

वर्गन्नतीबाबत मार्गदर्शक सूचना 
- यावर्षी ज्या विद्यार्थ्यांची आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पुर्ण झालेले आहे, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत नियमित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. 
- शिक्षकांनी विविध साधन तंत्राचा वापर करुन ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत फक्त आकारीक मूल्यमापन प्रक्रिया पुर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारीक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर शंभर गुणांमध्ये करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांची श्रेणी निर्धारीत करण्यात यावी. 
- कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे आकारीक, संकलीत मूल्यमापन करणे शक्य झाले नाही. अशा विद्यार्थ्यांना शासनाने सूचित केल्यानुसार आरटीई कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नती करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर ‘आरटीई अॅक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत’ असा शेरा नमूद करावा. 
- कमी श्रेणी मिळालेल्या विद्यार्थी, तसेच आरटीई कायद्यानुसार वयानुरुप दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करावे. यासाठी शैक्षणिक संशोधन परीषदेच्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घ्यावी. तसेच नियमित वर्गाध्यपनाची प्रक्रियाही पुर्ण करावी. 
- यावर्षी नव्याने कोणत्याही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रकारे मूल्यमापन करण्यात येवू नये. 
- सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक, संचयी नोंदपत्रक इत्यादी अभिलेखे नियमित वेळेत पुर्ण करावे त्यानंतर स्थानिक परिस्थितीनुरुप वितरीत करावे. 
- क्षेत्रीय स्तरावरुन मूल्यमापनाबाबत कोणत्याही सूचना शाळांना देण्यात येवू नयेत. 
- सदर सूचना राज्य शासनाचा आभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहील. 
- कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी पुढील शैक्षणिक सत्रामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेच्यावतीने कृतीकार्यक्रम विकसित करण्यात येईल. यासंदर्भात स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येणार असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी पत्राद्वारे कळवले आहे. 

Edited - Ganesh Pitekar

loading image