esakal | धक्कादायक! कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे कळताच उडाला एकच गोंधळ, अनेकांनी काढला पळ  
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona News Paithan

काही दिवसांपूर्वी कोविड सेंटरला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली होती. यावेळी सदर विद्यार्थ्याने परीक्षा देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती.

धक्कादायक! कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे कळताच उडाला एकच गोंधळ, अनेकांनी काढला पळ  

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण येथील एका महाविद्यालयात बुधवारी (ता.सात) धक्कादायक घटना घडली आहे. चक्क कोरोनाबाधित विद्यार्थी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रात पेपर देण्यासाठी आला. याबाबतची माहिती महाविद्यालयीन प्रशासनाला कळताच एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी पळ काढू लागले. ही माहिती पोलिसांना कळविल्यानंतर कोरोनाबाधित विद्यार्थी मास्क घालून इतर विद्यार्थ्यांबरोबर परीक्षा देताना दिसला. येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात बुधवारी इंग्रजीचा पेपर होता. यावेळी साधारण १ हजार ४५५ विद्यार्थी उपस्थित होते.

दिलासादायक! कोरोनाच्या काळात तरुणासह महिलांना मोसंबीच्या गळपासून मिळतोय रोजगार

परीक्षा सुरु होऊन काही वेळेनंतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेला विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती महाविद्यालयाचे मुख्य लिपिक इम्रान खान यांना मिळाली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. याविषयी पोलिसांना माहिती दिली गेली. पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, छोटुसिंग गिरासे यांनी कोविड केंद्राशी संपर्क साधून कोरोनाबाधित विद्यार्थ्याचे नाव घेतले. महाविद्यालयात त्याच शोध घेतला असता तो परीक्षा देताना आढळला. ताबडतोब त्याची दुसरीकडे व्यवस्था करण्यात आली. 

Corona Vaccination: औरंगाबाद शहरातील दीड लाख नागरिकांना लसीकरण

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे कोविड सेंटरचे दुर्लक्ष
काही दिवसांपूर्वी कोविड सेंटरला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली होती. यावेळी सदर विद्यार्थ्याने परीक्षा देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कोविड सेंटरला कोविडचे नियमपाळून पीपीई कीट घालून परीक्षा देण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना कोविड प्रमुखांना दिला होता, असे कोरोनाबाधित विद्यार्थ्याने महाविद्यालयाला सांगितले. मात्र प्रत्यक्षात तो साधा मास्क घालूनच परीक्षेला हजर होता. 

संपादन - गणेश पिटेकर

go to top