esakal | पत्नीला मारायला निघाला होता, स्वतःचाच गळा घेतला कापून!
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पत्नीला मारायला निघाला होता, स्वतःचाच गळा घेतला कापून!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पत्नीसोबत कायदेशीर घटस्फोट झाल्यानंतर तिच्या मागे बसस्थानकात जात रागाच्या भरात पत्नीवर वार करणार तितक्यात बसस्थानकावर पाण्याच्या बॉटल्स विक्री करणाऱ्या मुलाने रोखले. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडली होती. या प्रकारानंतर वार करणाऱ्याने पकडले गेल्याने स्वतःच्याच गळ्यावर वार करून घेतला होता. (Pune News)

भाऊसाहेब तुळशीराम काकडे असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. दरम्यान संबंधित महिला ही बसने गावी जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर गेली असता, पती तिच्या मागे मागे गेला. तिच्यावर चाकूने वार करण्याचा त्याचा डाव होता.

हेही वाचा: ...अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा थेट इशारा

मात्र, तशी संधी मिळाली नाही. बसस्थानकावर पोहोचल्यानंतर हळूच वार करून पळून जाण्याच्या इराद्याने महिलेच्या मागे गेल्यानंतर त्याने चाकू काढून महिलेवर वार करण्याच्या क्षणालाच बसस्थानकावर पाण्याच्या बाटल्या विक्री करणाऱ्या मुलाने प्रसंगावधान राखत आरोपीला रोखले.

त्याचवेळी आपला उद्देश साध्य न होताच पकडले गेलो. या भावनेने रागाच्या भरात आरोपीने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून घेतले होते. यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. दरम्यान त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी हलविण्यात आले होते.

loading image
go to top