

dark side of Aurangzeb's rule, including cruelties like imprisoning his father Shah Jahan and killing his brother Dara Shikoh, highlighting Mughal Empire's tyrannical history.
esakal
सत्तेच्या हव्यासापोटी औरंगजेबाने सर्व नैतिक मूल्ये धाब्यावर बसवली होती. फ्रान्सचा प्रवासी फ्रांस्वा बर्नियर याने त्याच्या 'ट्रव्हल्स इन द मुघल एम्पायर' या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे औरंगजेबाने मुघल तख्तावर बसण्यासाठी स्वतःच्या जन्मदात्या पित्याला म्हणजेच शहाजहान यांना आग्रा किल्ल्यात कैद केले. आपल्या वडिलांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कैदेत ठेवून त्याने केवळ मुकुटच मिळवला नाही, तर रक्ताच्या नात्यातील क्रूरतेचा एक नवा काळा इतिहास लिहिला.