कोरोनाकाळात ‘आयुष’ स्वास्थ्य

Aayush
Aayush

पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आयुष मंत्रालयाने नागरिकांना काही उपाययोजना अवलंबण्याचे निर्देश दिले आहे. वैयक्तिक रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच काही आयुर्वेदिक औषधेही सुचविण्यात आले आहे. हा सल्ला अंमलात आणल्यामुळे अनेकांना स्वास्थ्य लाभत आहे. 

रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी चतुःसूत्री
श्‍वसनाशी निगडित आजारांसाठी आजवर झालेल्या संशोधनाच्या आधारे आयुष मंत्रालयाने डॉक्‍टरांच्या सल्ल्याने हे उपाय सुचविले आहे.

१) रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे उपाय 
    दिवसभर गरम पाणी प्यावे
    रोज ३० मिनिटे योगासने, प्राणायाम, मेडिटेशन करावे
    जेवनामध्ये हळद, जिरा, धने आणि लसूण यांचा समावेश असावा

२) आयुर्वेदातील घरगुती उपाय 
    सकाळी दहा ग्रॅम च्यवनप्राश घ्यावे, मधुमेहाच्या रुग्णांनी साखर विरहित च्यवनप्राश घ्यावे.
    आयुर्वेदिक काढा घ्यावा. ज्यामध्ये तुळस दालचिनी, कालिमीरी, सुंठ आणि मनुका यांचा समावेश असावा. दिवसातून दोनदा हा काढा घ्यावा. चवीसाठी गूळ किंवा लिंबाचा रस सोबत घेऊ शकतात.
    सुवर्ण दूध - दीडशे मिलिलिटर दुधाबरोबर अर्धा चमचा हळद घ्यावी. दिवसातून दोनदा.

३) सोप्या आयुर्वेदिक प्रक्रिया 
     नासिकेसंबंधी - सिसम आणि नारळाचे तेल किंवा तूप दोनही नाकपूड्यांना सकाळ संध्याकाळ चोळावे.
     तेल चोळण्याची प्रक्रिया - एक छोटा चमचा तेल जिभेवर टाका. (गिळू नये) तोंडाच्या आतल्या भागात दोन ते तीन मिनिटे चोळावे त्यानंतर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. दिवसातून दोनदा हा प्रकार करावा.

४) कोरडा खोकला आणि घश्‍ााची काळजी 
    आजवाईन किंवा पुदिनाची वाफ घ्यावी
    मधासोबत लवंगाची पावडर दिवसातून दोन तीन वेळा घ्यावी
    खोकल्याच्या गंभिरतेनूसार डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगर - शिफारशीनंतर प्रतिसाद
जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के लोकांपर्यंत अर्सेनिक गोळ्या पोचविण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय, जिल्ह्यातील तीन हजार खासगी होमिओपॅथी डॉक्‍टर, सामाजिक संघटना यांच्यासह जिल्ह्यातील सात होमिओपॅथी महाविद्यालयांच्या मार्फत हे काम केले जात आहे. आतापर्यंत सुमारे २५ लाख लोकांपर्यंत या गोळ्यांचा डोस पोचलेला आहे. 

सोलापूर - काळ्याबाजारात विक्री
संशमनी वटी, आयुष-६४,अश्वगंधा घनवटी, अगस्ती हरितकी वटी, च्यवनप्राश, अणू तेल नस्य, आयुष काढा ही औषधे बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी आयुष काढ्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आयुष काढा तयार करून घ्यावा लागतो. ५० रुपयांची बाटली काळ्या बाजारात २०० ते २५० रुपयांना विकली जात आहे. 

नांदेड - मागणी वाढली
मुख्यतः मुंबई, दिल्लीमध्ये आयुष मंत्रालयाची परवानगी असलेल्या होमिओपॅथी औषधांची निर्मिती होते. परंतु नागपूर आणि मुंबई दोन्ही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढल्याने व लॉकडाउनमध्ये पुरवठ्याची चैन तुटल्याने व अचानक मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झालाा आहे, असे होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉ. विजय शर्मा यांनी दिली.

नाशिक - च्यवनप्राश संपले
उन्हाळ्यात च्यवनप्राश खाणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी असते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयुष’ने शिफारस केलेल्यांमध्ये च्यवनप्राश असल्याने ते ‘आऊट ऑफ स्टॉक’ झालंय. एका कंपनीच्या २४ पॅकिंगच्या १० हजार बॉक्‍सची विक्री झाली आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या घटकांचा घरोघर वापर सुरु झाला आहे. 

जळगाव - सामाजिक संघटनांकडून वाटप
 जळगावसह धुळे व नंदूरबार जिल्ह्यात या गोळ्यांना मागणी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने कन्टेनमेंट झोनमधील कुटुंबांमध्ये या औषधीचे वाटप सुरु करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांत विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून प्रशासनाने ७१ हजार बाटल्यांचे वाटप पूर्ण केले असून जिल्ह्यात साधारण अडीच लाख बाटल्या वाटपाचे उद्दिष्ट आहे. 

सातारा - औषधांचा तुटवडा
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. त्यातच सर्व व्यवहार खुले केले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांकडे लोक अधिक वळू लागलेले दिसतात. त्यातूनच संशमीवटी व आरसेनिक आल्बम या गोळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. परिणामी मेडीकल दुकानांमध्ये त्याचा सध्या तुटवडा आहे. परंतु, होमिओपॅथी डॉक्‍टरांकडे औषध उपलब्ध आहे. 

औरंगाबाद - शास्त्रोक्त वितरणाची गरज
काहीजणांनी या औषधींचा बाजार मांडल्याचे दिसुन येत आहे. काही राजकीय मंडळीकडुनही या औषधींची एकत्रित खरेदी केली जात आहे. त्यातुन ही औषधींचे मोफत वितरण केली जात आहे. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने ती दिली जात नसल्याचे दिसुन येत आहे. या औषधींचे बाजारीकरण होत आहे. डॉक्‍टरांच्या उपस्थितीतच डोस बनवुन वितरण करावे असे डॉ. आनंद बेले यांनी सांगितले.

सर्वसाधारण किंमती
संशमनी वटी १५ रूपये
अश्‍वगंधा घनवटी १०० रूपये
गिलोय घनवटी ११५ रूपये
आयुष काढा १०० रूपये

युनानीतील प्रतिबंधात्मक औषधे
औषधाचे नाव - मात्रा - घ्यायचा प्रकार

- शोरबत उनाब  - १०ते २० मिली - दिवसातून दोनदा
- तिर्याक अरबा - ३ ते ५ ग्रॅम - दिवसातून दोनदा
- रोगन बनफ्षा - बाम - नाकाला चोळावा
- रोगन बबूना - बाम - छाती आणि डोक्‍याला चोळावा
- अर्सेनिक अल्बन-३० सकाळी उपाशीपोटी घ्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com