
मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली. त्यापूर्वी मुंबईत आझाद मैदानात मराठी भाषा केंद्र व समविचारी संस्था, राजकीय पक्ष यांच्यावतीने हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आयोजित जाहीर सभेत मराठीच्या मुद्द्यांवर सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येऊन शासन निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवायचे असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचा भाग म्हणून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधातील अन्याय्य शासननिर्णयांची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.