मुंबई - मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे उद्या (ता. २९) आझाद मैदानात धडकणार आहेत. जरांगे यांचा मोर्चा मजल दरमजल करीत मुंबईच्या दिशेने आगेकूच करीत आहे. मराठा समाज उत्स्फूर्त या आंदोलनात सहभाग होत असल्याने गणेशोत्सव काळात मुंबईत येणाऱ्या या मोर्चाने मुंबईतील व्यवस्था विस्कळित होण्याची शक्यता आहे. आझाद मैदानासह आजूबाजूचा परिसर आजच गजबजला आहे.