भारतीयांवर बीए-2 व्हेरियंटचा परिणाम होणार का? रवी गोडसेंची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Godase

कोरोनाची चौथी लाट येणार नाही, भारत मास्कमुक्त करा : रवी गोडसे

कोरोनाचा (Corona) पहिला रुग्ण सापडलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. चीनसह (China) पश्चिम युरोप आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाचा प्रसार वेगात होत असताना भारतातही कोरोना संक्रमणाची आणखी एक लाट येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. युरोपात डेल्टाक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सापडत आहेत. याचा भारताला काय धोका आहे का? आधी डेल्टा त्यानंतर ओमायक्रोन (Omicron Variant) आणि आता बीए-२ ची चर्चा होत आहे. याचा भारतावर नेमका कोणता परिणाम होणार की होणार नाही याविषयी डॉ. रवी गोडसे यांनी साम टीव्हीवर या सगळ्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

व्हेरियंट म्हणजे काय याबाबत माहिती देताना गोडसे म्हणाले, व्हेरियंट म्हणजे आरएनस व्हायरस आहे जो सतत बदलत असतो. म्हणजेच नैसर्गिक दबावामुळे ते हळूहळू बदलतात. निसर्ग जसा बदलतो तसाच हा व्हायरस देखील बदलत आहे. १९१८ साली स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हाही तो खूप मोठ्या प्रमाणात पसरला होता. निसर्ग चक्राप्रमाणे हे बदलत राहतात. शेवटी असा एक आजार येतोच जो मोठ्या प्रमाणात पसरत असतो. आता तो व्हायरस म्हणजे ओमायक्रोन आहे.

हेही वाचा: Russia Ukraine War l मध्य-पूर्वेतील देशांवर संकट; भारताकडून मागितली मदत

ऑमायक्रॉनबाबत गोडसे म्हणतात, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरायला सुरुवात झाली तेव्हाच मी सांगितले होते. ओमायक्रोन हा आफ्रिकेची व्हॅक्सिन होईल आणि भारताचा बुस्टर. भारतात जेव्हा दुसरी लाट पसरली तेव्हा मे २०२१ मध्ये तीन ते चार हजार लोकांचा मृत्यू होत झाला. कदाचित ही आकडेवारी जादाही असेल. याउलट चीनमध्ये जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ या चौदा महिन्यात याठिकाणी एकाही नागरीकांचा मृत्यू झाला नाही. मात्र चीनने हि माहिती जगासमोर आणली नाही.

बीए-२ व्हेरियंटबद्दल बोलताना डॉ रवी गोडसे म्हणाले, बीए-२ व्हेरियंटचा भारताला काहीही धोका नाही. निसर्ग नियमानुसार कोणताही आजार हा जास्तकाळ टिकून राहत नाही. त्यामुळे या व्हेरियंटला घाबरून जावू नका. ओमायक्रोनला तुम्ही थांबवू शकत नाही. मात्र, यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. आठ महिन्यापूर्वी डेल्टा-प्लसचे वारे आले होते आता कोठे गेला हा व्हायरस ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. खरंतर डेल्टा हा अल्फापेक्षा जास्त खतरनाक होता. ओमिक्रोन हा खूपच जास्त संसर्गजन्य व्हायरस आहे. आणि बीए-२ त्यापेक्षा जास्त आहे. पण ज्यांना ओमायक्रोन झाला आहे. त्यांना बीए-प्लस, डेल्टा होणार नाही. त्यामुळे भारताला घाबरण्याचे काहीही कारण नाही असेही ते म्हणाले.

Web Title: Ba 2 Variant Affect Indians Information Dr Ravi Godse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top