Baba Maharaj Satarkar : अन् वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाची चाल गायली..विठूभक्तीची शेकडो वर्षांची परंपरा जपणारे बाबा महाराज

बाबा महाराज हे लहानपणापासूनच दादा महाराजांचे लाडके होते. लहानपणापासून ते त्यांच्यापुढे बसून कीर्तन ऐकायचे
Baba Maharaj Satarkar
Baba Maharaj Satarkaresakal

Baba Maharaj Satarkar : प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ कीर्तनकार अशी त्यांची जगभरात प्रचिती होती. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशे वर्षांची परंपरा जपली होती. लहानपणापासूनच बाबा महाराज त्यांचे आजोबा आणि आई-वडिलांसोबत वारी करायचे. लहानपणापासून सुरु असलेली ही त्यांची वारी वयाच्या ८३ व्या वर्षीसुद्धा त्यांनी सुरु ठेवली होती. बाबा महाराज हे लहानपणापासूनच दादा महाराजांचे लाडके होते. लहानपणापासून ते त्यांच्यापुढे बसून कीर्तन ऐकायचे. तेव्हापासून त्यांच्या कानावर जे काही पडले ते त्यांच्या संस्कारात उतरले.

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. ती त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली.

वयाच्या चौथ्या वर्षी कीर्तनाला सुरुवात

वयाच्या चौथ्या वर्षी बाबा महराजांनी दादा महाराजांच्या कीर्तनात चाल म्हटली. त्यांना दादा महाराजांच्या पायाला जखम असतानाही चिखलात उभे राहून कीर्तन करताना पाहिले. आणि हीच निष्ठा पुढे बाबा महाराजांच्या पिढीने पुढेही जपली.

Baba Maharaj Satarkar
Babamaharaj Satarkar Passed Away: प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दादा महाराज हे बाबा महाराजांच्या आजोबाचे नाव. एक नातू म्हणून बाबा महाराजांनी आजोबांची सगळे चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बाबा महाराजांच्या पिढीत आजपर्यंत वारी कोणी चुकवलेली नाही. आजोबा दादा महाराज, वडील भाऊ महाराज त्यानंतर मी. माझ्या पुढची मुलगी भगवतीताई, नातू चिन्मय महाराज अशी समर्थ पिढी वारकरी संप्रदायाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करीत होते.

Baba Maharaj Satarkar
Ashadhi Wari 2023 : भक्त पुंडलिकाने विठुरायाकडे फेकलेल्या विटेवर पांडुरंगाने पाय ठेवला अन् इंद्रराजाचा उद्धार केला

वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी लिहीलेल्या एका लेखात त्यांना सांगितले होते की, "माझे वय ८३ आणि माझी वारी ८४ वी. त्याचे कारण म्हणजे माझी एक वारी आईच्या पोटात झाली आहे. " त्यांच्या वयोमानाने त्यांच्याकडून वारीत चालणे होत नव्हते तरी ते चार पाऊले वारीत चालून गाडीतून वारी अनुभवायचे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com