Babamaharaj Satarkar Passed Away: प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं आहे.
Babamaharaj Satarkar Passed Away
Babamaharaj Satarkar Passed AwayEsakal

प्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर याचं निधन झालं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून जगभरात त्यांचं नाव आहे. महाराष्ट्राच्या गावागावात त्यांचं किर्तन ऐकलं जात होतं, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत त्यांचं नाव घेतलं जात. आज त्यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं आहे.

नेरूळ येथील त्यांच्या गावी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती आहे. बाबामहाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.

Babamaharaj Satarkar Passed Away
Ashadhi Wari : पंढरीची वारी आहे माझ्या घरी! ३५ वर्षांपासून दापोडीतील दोन मैत्रिणींची एकत्र पायीवारी

बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी) 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.

Babamaharaj Satarkar Passed Away
Gas Cylinder च्या स्फोटात कऱ्हाड हादरलं! दोन मुलांसह सात जण होरपळून जखमी, पाच घरांचं 20 लाखांचं नुकसान

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नसल्याने त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत.

Babamaharaj Satarkar Passed Away
PM Modi Ahmednagar Visit: मोदींच्या कार्यक्रमासाठी नागरिकांना आणायला पाठवलेल्या गाड्या माघारी... जाणून घ्या कारण

आमदार सत्यजित तांबे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com