

Babasaheb Patil
esakal
मुंबई : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फी करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिले आहेत. बँकेच्या संचालकपदी सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ राहिल्याने बँकिंग कायदेविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.