

Babasaheb Patil RBI action news
esakal
Maharashtra Cooperative Minister Babasaheb Patil : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर १० वर्षांहून अधिक काळ राहिल्याप्रकरणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कारवाई केली आहे. त्यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.