शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्राने महाराष्ट्रातील तरूण पिढीवर गारूड केले होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केलेल्या बाबासाहेबांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे पाच वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्राने महाराष्ट्रातील तरूण पिढीवर गारूड केले होते. हयातभर त्यांनी बारा हजारांवर व्याख्याने या विषयावर देऊन समाजात जनजागृतीचे मोठे कार्य केले होते. त्यांच्या साहित्य संपदा मोठी आहे.

साहित्य संपदा

- आग्रा

- कलावंतिणीचा सज्जा

- जाणता राजा

- पन्हाळगड

- पुरंदर

- पुरंदरच्या बुरुजावरून

- पुरंदऱ्यांचा सरकारवाडा

- पुरंदऱ्यांची नौबत

- प्रतापगड

- फुलवंती

- महाराज

- मुजऱ्याचे मानकरी

- राजगड

- राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची २०१४ मध्ये प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीदेखील आहे. भाषांतरकार - हेमा हेर्लेकर)

- लालमहाल

- शिलंगणाचं सोनं

- शेलारखिंड. (शिवाजी महाराजांच्या काळातील सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अजिंक्‍य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला "सर्जा‘ हा मराठी चित्रपटही निघाला होता. तो रसिकांच्या पसंतीला उतरला होता.)

- सावित्री

- सिंहगड

हेही वाचा: एकच शब्द, एकच ध्यास...; 'छत्रपती शिवाजी महाराज';

ध्वनिफिती

- बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन - भाग १, २, ३ (कॅसेट्‌स आणि सीडीज)

- शिवचरित्र कथन भाग १ ते १५ कॅसेट्‌सचा आणि सीडीजचा सेट.

- शिवाय, इंटरनेटवरील दृकश्राव्य माध्यमातूनही बाबासाहेबांच्य आवाजात शिवचरित्र ऐकता येते.

- महाराष्ट्रातील तरूण पिढीवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्राने गारूड केले होते. हयातभर त्यांनी बारा हजारांवर व्याख्याने या विषयावर देऊन समाजात जनजागृतीचे मोठे कार्य केले.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे : चालता-बोलता इतिहास

बाबासाहेबांच्या कार्याचा यांनी केला गौरव

- सातारच्या राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनी शिवचरित्रकार म्हणून बाबासाहेबांच्या कार्याची योग्य दखल घेऊन त्यांचे कौतुक केले होते.

मिळालेले अन्य पुरस्कार

- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२)

- डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने बाबासाहेबांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल सन्माननीय डी.लिट. देवून त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. (२०१३)

- ‘बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्राचे लेखन डॉ. सागर देशपांडे यांनी केले आहे.

- महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार १९ ऑगस्ट २०१५ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला. त्या दिवशी श्रावण शुद्ध चतुर्थी होती, तो दिवस तिथीने बाबासाहेबांचा ९३वा वाढदिवस होता.

- गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२०१६)

- पद्मविभूषण (२०१९)

loading image
go to top