Bacchu Kadu : १३ आमदार लोक विसरले, केवळ भाषणाने...; बच्चू कडूंनी राज ठाकरेंना डिवचलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu Kadu

Bacchu Kadu : १३ आमदार लोक विसरले, केवळ भाषणाने...; बच्चू कडूंनी राज ठाकरेंना डिवचलं

अमरावती - आमदार रवीराणा यांच्याशी झालेला वाद मिटल्यानंतर फारसे चर्चेत नसलेले आमदार बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत केवळ भाषणांनी मत मिळत नसल्याचं म्हटलं. अमरावती येथील संत कृपा क्रीडा मंडळाद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (Bachu Kadu news in Marathi)

हेही वाचा: समलिंगी विवाह मान्यतेसंदर्भातील याचिकेची सुनावणी लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे घ्या; SC मध्ये मागणी

बच्चू कडू म्हणाले की, आम्ही जाती-पाती, धर्माच्या नावावर काहीही करत नाही. जात आणि धर्म लावला की पक्ष वाढतो. मनसेने मध्यंतरी सुरू केलं होतं. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. अरे बाबा तु कुठं हिंडतो का? निव्वळ बोलल्याने काहीही होत नाही. तरी लोकांनी १३ आमदार निवडून दिले होते. महाराष्ट्र आता ते १३ आमदार विसरून गेला. पण बच्चू कडू चारवेळा निवडून आला. तुमच्यासारख्या लोकांनी चारवेळा अपक्ष आमदार म्हणून मला निवडून दिल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं.

मी कधीच जाती, धर्माचा झेंडा लावला नाही. सामान्यांना आपलं वाटल पाहिजे, हा आमचा माणूस आहे हे वाटलं पाहिजे. त्यावेळी लोक मतदान करताना जात पाहात नाही. मागील वीस वर्षात मंदीर, मशिदीचे वाद लावले नाही. ते लावले असते तर १० आमदार निवडून आले असते, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

हेही वाचा: Bhalchandra Nemade: 'चीनला आपला शत्रु म्हणू नका! आपले शिपाईही तेच करतात'

दरम्यान राज्यात शिंदे सरकार आलं. अनेकांनी मंत्रीपद मागितले. पण बच्चू कडूने थेट मंत्रालय आणले. केवळ सरपंच नाही, तर अख्खी ग्रामपंचायत आणल्याचं कडू यांनी नमूद केलं. लोक म्हणतात गुवाहाटीला गेले. ५० खोके मिळाले. पण ५० खोके घरात मावतात का? असा सवालही कडू यांनी केला.

हेही वाचा संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...