
गेल्या सात दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमात गोंधळ घातला. अजित पवार यांच्या कार्यक्रमावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांनी धीरानं घ्यावं असा सल्ला दिला आहे.