
Bacchu Kadu : हो, पक्षाच्या नेत्यासोबत गद्दारी करूच, पण...; बच्चू कडू अखेर स्पष्टचं बोलले
मुंबई - महाविकास आघाडीमधील मंत्री बच्चू कडू मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघात झाला होता. त्यापाठोपाठ एका आजोबांनी बच्चू कडू यांना धारेवर धरत गुंडांसोबत गेल्यचा दावा केला होता. त्यातच त्यांना नाशिक न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती. त्यातच आज बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाण्याबाबत मोठं विधान केलं.
बच्चू कडू म्हणाले की, मी सामान्य माणूस आहे. लोकांना आता बाप मेल्याचं दु:ख नाही होत. नेता मेला की दु:ख होतं. नेता मेला की, गावागावात त्याचे श्रद्धांजलीचे बॅनर लागतात. आम्ही नेहमी सांगतो की, उद्या बच्चू कडू जरी गेला तरी, आपल्या माय-बापावर निष्ठा ठेवा. सामान्य माणूस एवढा राजकारणी झाली की ते प्रत्येक गोष्टीत आपला नेता पाहायला लागला.
उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे का गेले? त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. ते राज्यासाठी गेले होते की, मुख्यमंत्रीपदासाठी गेले होते? अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेचं काय भलं केलं? कोविडमध्ये त्यांची कामगिरी उत्तम होती. मात्र राजेश टोपे यांची साथ होती, हे विसरून चालणार नाही, असही बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी विचारांसोबत गद्दारी केली. आम्ही सामान्य जनतेसोबत गद्दारी केली नाही. पक्षाच्या नेत्यासोबत गद्दारी करू पण आम्ही गद्दार नाही. आमची पानटपरी स्वत:ची आहे. आम्हाला काँग्रेस, भाजपने निवडून दिलं नाही. आम्हाला सामान्य माणासाने निवडून दिलं. बच्चू कडूंची गद्दारी पक्षासोबत होऊ शकते, सामान्य नेत्यांबरोबर होऊ शकत नाही, असंही बच्चू कडू यांनी ठणकावून सांगितलं.