रावसाहेब दानवेंना घरात घुसून फटकवलं पाहिजे; बच्चू कडूंचा घणाघात

टीम ई-सकाळ
Thursday, 10 December 2020

मागच्या वेळी दानवे यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा त्यांच्या घराला घेराव घातला होता.

Farmers Protest : नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. आणि दिवसेंदिवस या आंदोलनाची व्याप्ती वाढतच चालली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधक यांच्यात खटके उडत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत.

यात आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भर पडली आहे. सत्ताधारी भाजप पक्षाची बाजू घेताना शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा टीकेचे धनी बनले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य दानवे यांनी केले होते. 

अंबानींच्या घरी आला नवा पाहुणा; मुकेश अंबानी बनले आजोबा​

याचा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी खसपूस समाचार घेतला आहे. दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांना घरात घुसून फटकवलं पाहिजे. मागच्या वेळी दानवे यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा त्यांच्या घराला घेराव घातला होता. मात्र, आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, त्यांना घरात जाऊन चोप दिला पाहिजे, असा घणाघात बच्चू कडू यांनी केला आहे.

संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असं म्हणणं म्हणजे शेतकऱ्यांचा मोठा अपमान आहे. त्यामुळे दानवे नक्की हिंदुस्तानचे आहेत की पाकिस्तानचे हे तपासावं लागेल आणणि त्यासाठी त्यांचा डीएनए तपासणे गरजेचं आहे, असंही कडू यांनी म्हटलं आहे.

Human Rights Day : तुम्हाला माहीत आहेत का तुमचे अधिकार? जाणून घ्या काय आहे महत्त्व​
 
रघुनाथदादा पाटील यांचा हल्लाबोल
रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याबद्दल आता जास्त बोलण्यात अर्थ नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. 

काय म्हणाले होते दानवे?
दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून त्यामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. सीएए आणि एनआरसीवरून मुस्लिमांना उचकवलं पण मुसलमान देशाबाहेर गेले का? त्यामुळे विरोधकांनी आता शेतकऱ्यांना हाताशी धरलं असून हे षड्यंत्र सुरू केलं आहे. याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे, असं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं. 

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bacchu Kadu slams BJP leader Raosaheb Danve over farmer protest statment