अंबानींच्या घरी आला नवा पाहुणा; मुकेश अंबानी बनले आजोबा

वृत्तसंस्था
Thursday, 10 December 2020

या नव्या पाहुण्याच्या आगमनाने मेहता आणि अंबानी या दोन्ही परिवारांमध्ये उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली आहे.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. नीता आणि मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका यांना मुलगा झाला आहे. बाळ आणि त्याची आई दोघांची तब्येत ठीक असल्याची माहिती अंबानी कुटुंबीयांच्या प्रवक्त्यांनी दिली. 

ते पुढे म्हणाले, 'भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने श्लोका आणि आकाश आज आई-वडील बनले. तर नीता आणि मुकेश अंबानी हे आजी-आजोबा बनले. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने मेहता आणि अंबानी या दोन्ही परिवारांमध्ये उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली आहे.'

कैलाश विजयवर्गीय, मुकुल रॉय जखमी; बुलेटप्रुफ वाहनामुळं वाचलो : जेपी नड्डा​

दरम्यान, आकाश आणि श्लोका हे गेल्या वर्षी ९ मार्चला विवाहबद्ध झाले होते. या विवाहाची चर्चा संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगभरात झाली होती. या विवाहाला अनेक प्रसिद्ध उद्योगपती, बॉलिवूड तारे-तारका, क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. नीता आणि मुकेश अंबानी यांना तीन मुले असून आकाश आणि ईशा हे जुळे आहेत, तर अनंत हा सध्या २५ वर्षांचा आहे. 

भारताच्या एकतेसाठी ही संसद बनेल उर्जा; नवीन इमारतीचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन​

आकाश आणि श्लोका लहानपणापासून मित्र असून धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. श्लोका ही हिऱ्याचे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी असून तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्समधून लॉमध्ये मास्टर्स केलं आहे. तसेच २०१४पासून ब्लू फाउंडेशनच्या संचालक पदाचा कारभारही ती पाहत आहे. तसेच ती कनेक्ट फॉर या संस्थेची सहसंस्थापिका म्हणूनही काम पाहते. या दोघांच्या प्री-वेडिंगचा सोहळा स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्जमध्ये ३ दिवस सुरू होता.

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani becomes grandfather as Shloka and Akash Ambani welcome baby boy