

Bachchu Kadu: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या आग्रही मागणीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन छेडलं आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला कोर्टाने परवानगी नाकारल्यानंतरही त्यांनी त्यांचं आंदोलन सुरुच ठेवलं. शेवटी सरकरच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेतली. त्यानुसार आज, गुरुवारी आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईत दाखल झाले आहेत.