Maratha Reservation : 'शब्द देत असाल तर विचार करून द्या, नाहीतर...'; जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचे सरकारला सूचना

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज बीड येथे इशारा सभा होणार आहे. या सभेपूर्वी जरांगे यांनी सरकारला वेळ वाढवून देणार नाही हे स्पष्ट केलं आहे
Manoj Jarange Bacchu Kadu
Manoj Jarange Bacchu Kadue sakal

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज बीड येथे इशारा सभा होणार आहे. या सभेपूर्वी जरांगे यांनी सरकारला वेळ वाढवून देणार नाही हे स्पष्ट केलं आहे. यानंतर राज्य सरकारकडून त्यांची समजूत घालण्याची प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आंदोलन न करता समाजाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत तसेच सरकारने विचार करून शब्द दिला पाहिजे अशी आपेक्षा व्यक्त केली.

जरांगे यांच्यासोबतच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, सगे- सोयरे बाबत माझा देखील गैरसमज झाला होता, सगेसोयरे यांची व्याख्या काय आहे, तर जे वडिलांच्या संबंधातील नात्य- गोत्यातील सर्वजण. ज्याच्यासोबत सोयरिक होऊ शकते ते सोयरे. सगे म्हणजे आपले सगळे. वडिल, काका, पुतण्या, मुलगी आणि तिचे मामा हे सगे सोयरे. पण आईच्या जात भेटण्याबात माझी मान्यता नाही, ते शक्यही नाही. त्यामुळे एका घरात दोन जाती होऊ शकतात.

जरांगे यांनी देखील चर्चा सुरू असताना आईच्या जातीचा आग्रह नाही, असे मान्य केल्याचे कडू म्हणाले. तसेच त्यांचा आग्रह हा गरीब मराठा जो कुणबी आहे त्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे असा आहे असेही त्यांनी सांगितले.

Manoj Jarange Bacchu Kadu
मराठ्यांना नोटीस काढल्याने आंदोलनाला फायदाच झाला! मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

कडू म्हणाले की, त्यांनी (मनोज जरांगे) देखील स्पष्ट सांगितलं आहे की, आईची जात पोरांना लावली जाऊ शकत नाही, त्यांचा वेगळा अर्थ काढला गेला जो चूकीचा आहे. त्यांचा सगेसोयऱ्यांचा अर्थ काका-पुतण्या, मामा-मावशी असा आहे. सगेसोयरे यांची व्याख्या करणे गरजेचे आहे. मी आंदोलक म्हणून मनोज जरांगे यांची भेट घेतली असून माझी भूमिका एका कार्यकर्त्याची आहे, असेही बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Manoj Jarange Bacchu Kadu
Sakshi Malik News : काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? साक्षी मलिकने दिलं उत्तर

आपण दोन-तीन वेळा सरकारला शब्द दिले होते, सरकारने देखील काही शब्द दिले होते. त्यापैकी काही गोष्टी दुर्देवाने होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे मागच्या सारखी फसगत होऊ नये असे आंदोलकांना वाटणे बरोबर आहे. समाजाला न्याय मिळणं ही आमची प्राथमिकता आहे असेही बच्चू कडू म्हणाले.

आता ही काही शब्द द्यायचे असतील तर सगळं विचारुन द्या. शब्द दिला ते करू शकलो नाहीत तर समाजाच्या मनात सरकारबाबत वाईट भावना निर्माण होईल. त्यातून काहीतरी उग्र निर्माण होईल. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की, शब्द देताना ते करणे शक्य असेल तरच तो द्यावा असेही बच्चू कडू म्हणाले. आंदोलन न करता समाजाचे सर्व प्रश्न मिटले पाहिजे, समाजाचे प्रश्न मिटत असतील तर वेळ काय आम्ही जीव द्यायला तयार आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com