
ठाणे: बदलापूर येथील एका शाळेत मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत काल घडलेल्या घटनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या सुमारे 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यानंतर आता कल्याण कोर्टाबाहेर आंदोलकांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. यात एका मातेचा आक्रोशानं मन हेलावलं आहे.