Badlapur Sexual Assault Case
esakal
दोन वर्षांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या घटनेनं संपूर्ण राज्याला धक्का बसला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एन्काऊंटरदेखील करण्यात आला होता. मात्र, आता याच प्रकरणातील एका सहआरोपीला भाजपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. तुषार आपटे असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्या नियुक्तीनंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.