Samruddhi HighwaySakal
महाराष्ट्र बातम्या
Samruddhi Highway : ‘समृद्धी’ ठरेल आर्थिक महामार्ग, मुख्यमंत्री फडणवीस; महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण
CM Devendra Fadnavis : ठाणे ते नागपूर जोडणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पूर्ण झाला असून तो महाराष्ट्राच्या विकासाला नवे आयाम देणारा आर्थिक महामार्ग ठरणार आहे.
नाशिक : ‘‘बहुप्रतिक्षित ठाणे ते नागपूर असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण झाला असून यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडणारा हा महामार्ग राज्यासाठी आर्थिक महामार्ग ठरणार आहे,’’असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हा महामार्ग देशातील सर्वोत्तम प्रकल्प असून यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

